IPL 2026 | GT vs PBKS Preview | गिल आणि अय्यर आमनेसामने; T20 संघातून वगळल्यानंतर प्रथमच खेळणार T20

सध्या देशात आयपीलचा फिव्हर सर्वत्र दिसून येत आहे. आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार असून हा चुरशीचा सामना चंदीगढ येथील पीसीए स्टेडियम येथे रंगणार आहे.

IPL 2026 | GT vs PBKS Preview |  गिल आणि अय्यर आमनेसामने; T20 संघातून वगळल्यानंतर प्रथमच खेळणार T20

सध्या देशात आयपीलचा फिव्हर सर्वत्र दिसून येत आहे. आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार असून हा चुरशीचा सामना चंदीगढ येथील पीसीए स्टेडियम येथे रंगणार आहे.  भारतीय एकदिवसीय संघाचे  शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे कर्णधार आणि उपकर्णधार राहिलेले आहेत. आता  गुजरात आणि पंजाब संघाचे कर्णधार म्हणून आज एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. चंदीगडच्या मैदानात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सचा सामना होणार आहे. पंजाब गेल्या वर्षीच्या आयपीएलचा उपविजेता संघ आहे, तर गुजरात गेल्यावर्षी चौथ्या क्रमांकावर होता. आयपीएल 2026 चा दोघांचा पहिला सामना आहे, आणि दोन्ही संघांना विजयी सुरुवात करण्याची आतुरता नक्कीच असेल. 

हेही वाचा –BCCI Broadcast Engineer Dies : IPL च्या रणसंग्रामात खळबळ; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये BCCI च्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू  

गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या लिलावात चांगल्या खेळाडूंना निवडल्यानंतर पंजाबची गणना बलाढ्य संघांमध्ये केली जात आहे. ऑनपेपर पंजाब संघ जेवढा बलाढ्य दिसत होता, तशी कामगिरीदेखील पंजाबने केली. 14 पैकी 9 सामने जिंकून क्रमवारीत प्रथम क्रमांक पंजाबने पटकावला, मात्र श्रेयस अय्यरच्या पंजाबला मात्र ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. पंजाबमध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. मात्र श्रेयस अय्यर, अर्षदिप सिंग, प्रियांश आर्य, युजवेंद्र चहल, शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. पंजाब पाच सामने चंदीगडमध्ये खेळणार आहे तर 2 हिमाचलच्या धर्मशाळामध्ये खेळले जाणार आहेत.  या सात सामन्यांपैकी जास्तीत जास्त सामने जिंकण्याचे लक्ष्य पंजाबचे असेल. रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरची जोडी नेहमीच कमाल करते त्याचीच पुनरावृत्ती हे दोघे या हंगामात करतील, अशी पंजाबच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. पंजाबकडे जेवढे चांगले भारतीय खेळाडू आहेत तेवढेच विदेशी खेळाडूदेखील आहेत. मार्कस स्टोयनीस, मार्को येनसन आणि आझमतुल्ला ओमरझाई ही त्यातील काही नावे आहेत, जी पंजाबच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये नेहमी समाविष्ट असतील.  

हेही वाचा – IPL 2026 RR vs CSK : ज्या टीमला चॅम्पियन केलं, तिला डोळ्यासमोर हरताना पाहून जडेजा भावूक, VIDEO Viral 

गुजरात टायटन्सची गणना कमी कालावधीत आयपीएलच्या यशस्वी संघांसोबत केली. 2022 पासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने चारपैकी तीन हंगामात प्लेऑफ्समध्ये एंट्री केली, त्यात एकदा विजेतेपददेखील गुजरातने पटकावलं. ऑनपेपर हलका वाटणारा  गुजरातचा संघ मैदानात बाकीच्या संघांना चांगल्या रणनीतींच्या जोरावर आश्चर्यचकित करून टाकतो. भारतीय कर्णधार शुभमन गिल ज्याला 'प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट'देखील  म्हणतात त्यांचं संघात असणं बाकीच्या संघावर आणि स्वतःच्या संघातील खेळाडूंवर चांगला प्रभाव पाडतं.  गुजरातची ताकद ठरतात ते गिल, बटलर आणि साई सुदर्शन यांचं त्रिकुटी आणि अष्टपैलू खेळाडू पण यासर्वांना एकत्र घेऊन दरवेळी उत्कृष्ट कामगिरी करणारा प्रशिक्षक आशिष नेहरा हा गुजरात संघाचा मास्टरमाइंड ठरतो. शुभमन गिल, जोस बटलर आणि रशिद खान यांचा खराब फॉर्म गुजरातला त्रस्त करू शकतो, पण या तिघांसाठी "Form is temporary, class is permanent" असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. गुजरातच्या चाहत्यांना आणि संघ व्यवस्थापनाला या हंगामातदेखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गुजरातच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होते की नाही हे नक्कीच बघण्यायोग्य ठरणार आहे. 

हायलाईट्स 

  • श्रेयस अय्यरसाठी 2025 हे वर्ष पीबीकेएस संघासोबत उत्कृष्ट ठरले असले तरी, न्यू चंदीगडमधील त्याची कामगिरी खराब आहे. तेथील पाच सामन्यांमध्ये त्याने 100 च्या स्ट्राईक रेटने केवळ 27 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 10 आहे.
  • आयपीएल 2025 मध्ये, प्रभसिमरन सिंगने पाच डावांमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि केवळ 104 च्या स्ट्राईक रेटने तीन वेळा बाद झाला. 
  •  गिलचा चहलविरुद्ध स्ट्राईक रेट केवळ 122 असून तो तीन वेळा बाद झाला आहे. 

खेळपट्टी आणि परिस्थिती
 

  • हा सामना खेळपट्टी क्रमांक 4 वर खेळला जाईल. ही तीच खेळपट्टी आहे जी गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने वापरली होती.  प्रियांश आर्याच्या शतकाच्या जोरावर त्यांनी 219 धावा केल्या होत्या. पंजाबचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला आणखी एका 'हायस्कोरिंग' सामन्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number